हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड....
रायगड जिल्ह्याच्या महाड तालुकाच्या २५ कि मी उत्तरेला हा किल्ला वसलेला आहे, समुद्रसपाटीपासून सुमारे २८५१ फूट उंच आणि चहु बाजूनी उत्तुंग अशा डोंगररांगांनी वेढलेला असा हा रायगड किल्ला. उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. महाराजांनी राजधानी म्हणून ह्या किल्ल्याची निवड का केली ह्याची जाणीव ह्या किल्ल्याची केवळ प्रगल्भता म्हणूनच नाही तर अनेक भौगोलिक दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे पण केली. ह्या किल्ल्याच्या पूर्वेला लिंगाणा आग्नेय दिशेला राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा तर उत्तरेला कोकणदिवा असे किल्ले व प्रदेश आपल्याला दिसतात. तसेच कोकणपट्टीत मोडत असल्यामुळे समुद्र जवळ; त्यामुळे सागरी दळणवळणासाठी हा अत्यंत महत्वाचा किल्ला.सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे शत्रूला अवघड वाटणारा प्रदेश त्यातल हे अवघड ठिकाण. म्हणून राजधानीसाठी अत्यंत सोयीस्कर आणि महत्वाचं ठिकाण. युरोपिअन ह्या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे संबोधतात. कारण जिब्राल्टर जितका अजिंक्य तितकाच रायगडही.
रायगडचे अगदी प्राचीन नाव 'रायरी' असे होते. सुमारे पाचशे वर्षापूर्वी हा फ़क़्त डोंगर होता तेव्हा यास 'रासवीटा ' आणि 'तणस' असे म्हंटले जाई. ह्या किल्ल्याची भव्यता, आकार आणि आजूबाजूचा दऱ्यामुळे ह्यास 'नंदादीप ' असे सुद्धा नाव पडले गेले.
रायगडचा उपयोग निजामशाहीत फ़क़्त कैदी ठेवण्यापुरता होता.पण रायगड खरा वाट पाहत होता शिवाजी महाराजांची व ती वेळ आलीच. यशवंतराव मोरे हा मोऱ्यांचा प्रमुख जावळी हून रायगडात राहिला आणि प्रतापराव मोरे विजापुरास पळाला आणि तो दिवस उजाडलाच महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व रायरी मे महिन्यात राजेंकडे आला मुल्ला अहमद नामक कल्याणचा एक सुभेदार खजिना घेऊन विजापुरास जात असल्याची बातमी राजेंना कळली , त्याला गाठून तो खजिना महाराजांनी रायगडाच्या बांधकामासाठी वापरला.
रायगडाच वर्णनाबद्दल सभासद बखर म्हणते "राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे द्शगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले. तक्तास जागा हाच गड करावा". ह्या दुर्गदुर्गेश्वराला विविध अशा १५ नावांनी संबोधिले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर
कवी भूषण रायगडाबद्दल सांगतात कि "शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’'
गडाबद्दल वर्णन करण्यासारख्या आणि पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या आपण पाहूया .
१. पाचाडचा जिजाबाईचा वाडा
२. खुबलढा बुरूज :
३. नाना दरवाजा
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
५. महादरवाजा
६. चोरदिंडी
७. हत्ती तलाव
८. गंगासागर तलाव
९.स्तंभ
१०. पालखी दरवाजा
११. मेणा दरवाजा
१२.राजभवन
१३. रत्नशाळा
१४. राजसभा
१५. नगारखाना
१६. बाजारपेठ
१७. शिर्काई देऊळ
१८. जगदीश्वर मंदिर
१९. महाराजांची समाधी
२०. कुशावर्त तलाव
२१. वाघ दरवाजा
२२.टकमक टोक
२३. हिरकणी टोक
पण काही ठराविक ठिकाणाबद्दल आपण संक्षिप्त रूपात पाहूया.
पाचाडचा जिजाबाईचा वाडा : जिजा मातांना उतारवयात गडावरची थंड हवा मानवत नसे म्हणून महाराजंनी पाचाडजवळ एक वाद बांधून दिला तो हाच मासाहेबांचा राहता वाडा. महाराजांनी शिपायांची व्यवस्था इथे केली होती पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
महादरवाजा : हादरवाजाच्या बाहेरील अम्गास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तसेच सरंक्षकासाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
वाघ दरवाजा : आज्ञापत्रात लिहिले आहे की, "किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरिता गड पाहून एक दोन -तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या." हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला.या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
टकमक टोक : गडाच्या टोकाकडे जाताना रस्ता निमुळता होत जातो तिथे आहे हे टकमक टोक. येथे सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे सावध राहाणं महत्वाच आहे. इथे विलक्षण गोष्ट म्हणजे शत्रूंना शिक्षा केली जात त्यांना गोणीत टाकून एवढ्या उंचावरून खाली ढकलून दिले जाई.
हिरकणी टोक : हिरकणी ची कथा आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहे, पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते.बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड खुबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
हत्ती तलाव: राज्याभिषेकाच्या वेळी ह्या महाराजांनी हत्ती आणला तरी कसा जिथे माणसांना चढणं मुश्किल. ह्यात पण राजेंचा चलाखी पण आपल्याला दिसून येईल. हत्ती जेव्हा लहान पिल्ल होती तेव्हा त्यांना पालखीतून येथे आणले गेले आणि मग गडावरच त्यांच्यासाठी सोय करण्यात आली व तिथेच ती मोठी झाली. हत्तीच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
ह्या गडानी अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवलेत. त्यात सर्वात चांगला प्रसंग म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध, १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. आपल्या प्रजेचा आनंद चिंतणारा असा हा आपला राजा. ह्यावरून ललिता पंचमीचा महत्व राजेंना नक्कीच ठाऊक होत. त्याचप्रमाणे संभाजी राजे आणि राजाराम राजे यांची मुंज आणि शंभू राजेंचे राज्यारोहण सुद्धा इथेच म्हणजे रायगडावर झाली.
पण पण पण ह्या रायगडाने अनुभवलेला सर्वात दुखद प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांचे निधन. सभासद बखर म्हणते, " ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले."
ह्या रायगडाच स्थान फ़क़्त महाराष्ट्राच्या नाही भारताच्या नाही पण पूर्ण जगाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे आहे.
Good info. Nicely written. Ambadnya.
ReplyDeleteAMbadnya Amitsinh
ReplyDeleteMast....ambadnya
ReplyDeleteMast....ambadnya
ReplyDeleteambadnya
Deleteप्रचंड किल्ल्याची भरपूर माहिती । सुंदर ब्लॉग ।
ReplyDeleteश्री राम अम्बज्ञ ।।
ambadnya nishikantsinh
Deleteछान माहिती दिली आहे.आभारी आहोत.
ReplyDeleteAmbadnya Shrikantsinh
Deleteछान माहिती दिली आहे.आभारी आहोत.
ReplyDeleteWell done prasad, waiting for info of other forts as well. Ambadnya
ReplyDeleteWell done prasad, waiting for info of other forts as well. Ambadnya
ReplyDeleteAmbadnya amitsinh
Delete