माझ्याबद्दल

Tell me something about yourself' Interview च्या वेळी हमखास विचारला जाणारा प्रश्न. बघायला गेलं तर  एकदम साधा सरळ प्रश्न पण interview घेणाऱ्याच्या मनात काय नक्की काय आहे आणि त्याला काय उत्तर अपेक्षित आहे हे कधीच कळलच  नाही. अगदी तेव्हा पासून माझ्यातला मी शोधण्याची सुरुवात झाली.
लहानपाणी क्रिकेट आणि नृत्य ह्या दोन गोष्टींमध्ये फार रुची होती किंबहुन ती ओळखच झाली. पण कॉलेजपासून आणि जॉब नंतर हि ओळख कालांतराने पुसली गेली आणि काही काळापुरता माझ्यातला मीच हरवला.

माझे सद्गुरु म्हणजे श्री अनिरुद्ध बापू यांनी दैनिक प्रत्यक्ष सुरु केला. बापूंच्या अग्रलेखांची आवर्जून वाट बघायचो. अग्रलेख काय प्रत्यक्ष मधले इतर content सुद्धा अगदी वेगळे वाटत. त्यात व्यासपीठ ह्या section मध्ये वाचक सुद्धा आपला लेख लिहू शकतो. त्या वेळेला जाणीव झाली कि आपण सुद्धा लेख लिहून दिला तर ? आणि बापूंच्या कृपेने  पहिला लेख २००६ रोजी लिहला गेला.  आणि स्वतःला प्रोत्साहन मिळत गेलं. आणि मग आठवण आली शाळेतली.  ती अशी कि निबंध हा माझा सर्वात आवडता प्रकार. परीक्षेत निबंधाचा पहिलाच प्रश्न असायचा. आमच्या टीचर आम्हाला बोलायच्या कि निबंध सर्वात शेवटी लिहा अगोदर सर्व प्रश्न सोडवून घ्या. माझ भलतंच, मी निबंध सुरुवातीलाच लिहायचो आणि ते हि भरपूर वेळ लिहित बसायचो. कारण मनाला येईल ते लिहायचा होत, कसल पाठांतर नाही काही नाही.

माझ्या सद्गुरूंनीच-माझ्या बापूंनीच माझ्या ह्या आवडत्या गोष्टीची जाणीव करून दिली . बापूंचे प्रत्येक शब्द विचार करायला भाग पाडतं आणि त्यामुळे आपोआप आपण त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत जातो. आणि तो आपण मांडत जातो मित्रांपुढे, सोशल मीडिया वर आणि ब्लॉगवर.

ह्या ब्लॉग मध्ये जे काही सुचलेलं असेल ते बापूंनी सांगितलेल्या सत्य प्रेम आणि आनंद ह्या त्रिसूत्रीच्या आधारे मांडण्याचा प्रयास असणार आहे कारण आपल्याला एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे 'करता हरता गुरु ऐसा ' 

No comments:

Post a Comment