डॉ अनिरुद्ध जोशी - म्हणजे माझे बापू. सद्गुरु, एक मित्र. एकाच वेळेला अनेक रोल play करणारे माझे मार्गदर्शक. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती.
अगदी लहान वयात, १९९७ होळी पौर्णिमेच्या वेळेस साईनिवास मध्ये बापूंना पहिल्यांदा पाहिलं. सद्गुरु ह्या शब्दाचा अर्थ देखिल तेव्हा माहित नव्हता. आई बाबा जायचे आणि त्यांच्यासोबत मीही जायचो. पण आज खूप छान वाटत कि जेव्हा सद्गुरु म्हणजे काय हे माहित नव्हतं तेव्हापासून बापूंच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला
गुरुवारचा दिवस म्हणजे बापूंना भेटण्याचा दिवस, आठवडाभरचा चार्जरच जणू . बापूंचा शब्द त्याची प्रवचन आयुष्य बदलवून टाकते.त्याचं मार्गदर्शन आयुष्य बदलवून टाकते, जर मार्ग भटकत असल्यास योग्य मार्गी आणतेच. बापूंचे अग्रलेख त्यांनी लिहिलेली सर्व ग्रंथ हे आपल्या जीवनाचा विकास घडवून आणतेच. बापूंची दूरदृष्टी खूप दांडगी, २००६ रोजी लिहिलेलं 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक आणि आताच्या घडामोडी पाहता त्यांचा सखोल अभ्यास आणि दूरदृष्टीपणाची जाणीव आल्यावाचून आपल्याला राहणार नाही. 'समर्थ इतिहास' ह्या लेखमालेत त्यांनी भारताच्या भव्य इतिहासाची ओळख करून दिली. ह्यावरून बापूंचा फ़क़्त दूरदृष्टीपणाच नाही तर भूत - भविष्य - वर्तमानातील सर्व गोष्टींचा अथवा घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास आपल्याला दिसून येतो.
फक़्त सद्गुरु म्हणूनच नाही तर एक डॉक्टर म्हणून माझे बापू फार अफाट आहे. त्यांनी सर्व सामान्यांना समजेल असा आरोग्यविषक सेमिनार घेतला. अनेक महत्वाच्या गोष्टी आणि आरोग्यावर होणारा परिणाम ह्याबाबतीत अत्यंत सोप्या आणि सर्वांना समजू शकणार्या भाषेत मार्गदर्शन केले.
बापुंबद्दल जेवढा लिहाव, बोलाव, ऐकावं, वाचावं, तेवढं कमीच. 'अफाट' हा शब्द ज्याच्यासमोर फिका पडला आहे असे बापू हे माझे सद्गुरु, बाबा, मित्र सर्वकाही आहे. भाग्य काय ते हेच. बापूंच्या देवयान पंथाच्या मार्गावर सतत राहो हीच चंडिका कुलाकडे प्रार्थना.
जय जगदंब जय दुर्गे.
No comments:
Post a Comment