जे ट्रेकिंग ला जातात त्यांना वाटत असते कि आपण आपल्या कुटुंबाला सुद्धा कधी तरी ट्रेकिंग ला न्यावे त्यांनासुद्धा सुंदर अनुभव मिळावा व इतिहासाला जवळून पाहता यावं पण ट्रेकिंग शब्द ऐकून तर अनेकांना असंच वाटत कि रश्शी लावून चढा किंवा कुठलीतरी खडतर वाट जी TV वर दाखवली जाते तसा काही भलताच प्रकार. पण हा सगळा गैरसमज आहे. आपल्या जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबातील कोणाला आपण नेऊ इच्छितो पण ह्या सर्व गैरसमजुतीमुळे ते येत नाहीत. अशांसाठी एक सोपा ट्रेक म्हणजे 'कोरीगड'. जिथे लहान मुले व वयस्कर व्यक्ती सुद्धा न थकता आरामात जाऊ शकतील .
निसर्ग संपन्न अशा पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरीटेज चा अधिकृत दर्जा आहे अशा नयनरम्य पश्चिम घाटात हा
किल्ला वसला आहे. पुणे जिल्ह्यात असलेला हा किल्ला लोणावळ्यापासून २० km अंतरावर आहे . तसं कोरीगडावर आपण वर्षात कधीही जाऊ शकतो पण जास्त मज्जा अनुभवाची असेल तर पावसाळ्यात गेलेलं उत्तम.
![]() |
कोरीगड |
समुद्रसपाटीपासून ३००० हून अधिक फूट उंचीवर हा किल्ला आहे त्यामुळे किल्ल्यावरून आजूबाजूचा प्रदेश फार सुंदर आणि नयनरम्य दिसतो. स्वर्गाबद्दल आपण वेगळीच कल्पना करत असतो कि आजूबाजूला ढग आहेत आपण पूर्णपणे ढगात आहोत वगैरे वगैरे. आपली ही संकल्पना कोरीगडावर पावसाळ्यात गेलात तर नक्की पूर्ण होईल. भरपूर उंचावर असल्यामुळे आजूबाजूला धुकंच धुकं दिसतात आणि अक्षरश १० फुटावर असणारा माणूस सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसत नाही .त्यात हवेचा झोत आपल्याला ढकलत असतो. कमीत कमी कष्टात अशा अनेक गोष्टींचा अनुभव आपल्याला कोरीगड देतो.
![]() |
पायऱ्यांवरून ओघळणारे पाणी |
किल्ल्यावर चढताना काही ठिकाणी पायऱ्या आहेत त्यामुळे पाउस पडत असताना ह्या पायऱ्यांवरून ओघळणारे पाणी एका लहान धबधाब्याच्या रूपात आपले स्वागत करतात. किल्ल्यावर जाताना हे ओघळणारे पाणी आपल्याला आगळी वेगळी मज्जा देऊन जाते. त्यामुळे प्रवासाचा थकवा आपोआप निघून जातोच .
इतिहासात कोरीगडाबद्दल जास्त काही नोंद नाही आहे पण असं मानलं जात कि शिवाजी महाराजांच्या आवडीच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. इ. स १६५७ रोजी स्वराज्यात महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे गड समाविष्ट केले त्यासोबत अजून एका किल्लाला स्वराज्यात येण्याचे भाग्य लाभले तो म्हणजे कोरीगड.
११ मार्च १८१८ रोजी कर्नल प्राथर नामक ब्रिटीश अधिकाऱ्याला किल्ला जिंकण्याचा मोह झाला आणि त्या रीतीने त्यानी प्रयास करण्यास सुरुवात केली. तीन दिवसाच्या अथक परीश्रमानंतरही हा किल्ला त्याला जिंकता येईना. त्यामुळे वैतागून गेलेला प्राथर च्या तोफेचा एक गोळा किल्ल्यावर असलेल्या दारूगोळ्याच्या गोदामात पडला आणि भयंकर आणि प्रचंड असा स्फोट किल्ल्यावर झाला आणि सर्वत्र आगीने कल्लोळ माजवला. त्यामुळे दारुगोळा तर नष्ट झालाच पण प्राणहानी सुद्धा झाली आणि मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली
गडावर एकूण ६ तोफा आहेत. लक्ष्मी मंदिराजवळ सर्वात मोठी तोफ आहे.
गणेश टाके : उत्तरेकडच्या दिशेत काही छोट्या गुहा आहेत त्याला गणेश टाके असे म्हणतात
![]() |
धुक्यांनी आच्छादलेलं तळ |
तसेच गडावर अजून सुंदर गोष्ट म्हणजे २ मोठी तळी आहेत. पावसाळ्यात धुकं असल्यामुळे ह्या तळ्यांचा सौंदर्यात आणिक भर पडते.
गडावरून कर्नाळा, तिकोना , तोरणा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान , राजमाची, आणि मुळशी चा जलाशय असा विस्तीर्ण आणि मोठा प्रदेश दिसतो. ह्या व्यतिरिक्त आपल्या नाकाच्या टोकावरून खाली बघितलं तर Aamby valley City सुद्धा स्पष्टपणे दिसते. आणि खाजगी विमानांसाठी असलेलं लहान विमानतळ पण सुंदररित्या दृष्टीक्षेपास पडतं.
पण सर्वात मजेशीर बाब म्हणजे वरील नमूद केलेल्या सर्व गोष्टी आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून बघू शकतो पण थोडी सावधानता बाळगून.. कारण ह्या किल्ल्याची तटबंदी रुंद असल्यामुळे चढणे व चालणे सहजतेने होऊन जाते त्यामुळे एक वेगळीच मज्जा अनुभवण्यास मिळते.
कुटुंबासोबत ट्रेक ला जायच आणि सुंदर किल्ला बघायचा असल्यास कोरीगड हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कमी थकव्यात सुंदर गोष्टी अनुभवण्यासाठी कोरीगडाला भेट जरूर द्यावी.
खूप छान माहिती����
ReplyDeleteधन्यवाद अमित
Deleteखूप छान
ReplyDeleteThanks paresh
Delete1 no राव भारी लगे रहो आता तुंग तिकोना बाकी आहे
ReplyDeleteनक्कीच coming soon in पावसाळा
DeleteVery nicely written...it encourages everyone to come to korigad...keep writing!
ReplyDeleteआभारी आहे मोहन
Delete