नावावरूनच आपल्याला अंदाज येईल कि हा किल्ला कसा असेल....हो, त्रिकोणी दिसणाऱ्या ह्या किल्ल्याला मिळालेलं 'तिकोना' नाव हे ह्याचा आकारावरूनच आहे हे कळून येत. मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना आपल्याला अनेक किल्ले दिसतात पण पुष्कळ वेळेला नक्की ओळखता येत नाही कि आपल्याला दिसलेला किल्ला नक्की कोणता होता. पण तिकोना हा किल्ला लांबूनही स्पष्ट दिसतो आणि त्याच्या त्रिकोणी आकारामुळे लगेच ओळखता हि येतो. खरं म्हणजे हाच त्रिकोणी आकार किल्ल्याच्या बाह्य सौन्दर्यास भर घालतो.
पवना नदी जवळ असणारा हा किल्ला पुण्यापासून साधारणतः ६० किमी आणि मुंबईपासून १२१ किमी अंतरावर आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणांनी नक्कीच लहानपणी पाटीवर किंवा पेपर व वही वर डोंगररांगा आणि त्यामधून येणारी नदी अशा प्रकारचे चित्र काढलेलं असेलच. तिकोना किल्ल्यावरून जेव्हा ह्या सुंदर पवना नदीस नजर पडते तेव्हा लहानपणीच्या ह्या गोष्टीची आठवण आल्यावाचून आपल्याला राहणार नाही.
पवना नदी आणि आसपासचा प्रदेश हा अगदी सुंदर रित्या आपल्याला ह्या किल्ल्यावरून दिसून येतो. तसेच सुमारे ३-४ किमी लांबवर आपल्याला तुंग हा किल्लासुद्धा सहज दिसून येतो. ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० होऊन अधिक फूट आहे त्यामुळे जोरदार हवेचा मारा आपल्यावर होतो आणि सुखावून टाकतो ढगांसोबत वास्तव्य केल्यासारख आपल्याला जाणवून राहतं.
तिकोना हा किल्ला तसा महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक होता आणि ह्याचे ऐतिहासिक महत्व सुद्धा आहेच. इ.स १५८२-८३ मध्ये अहमद निजामशहा यानी जुन्नर या प्रांतावर हल्ला चढवला व आजूबाजूचा बराचसा प्रांत बळकावला. लोहगड काबीज केल्यावर त्याने आपले लक्ष्य तुंग आणि तिकोना कडे वळवले व १५८५ पर्यंत त्यांनी हा किल्ला सर केला आणि निजामशाहीत आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५७ रोजी हा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात मानाने आणला. १६६५ रोजी झालेला पुरंदरचा तह सर्वांना ज्ञात आहेच त्या पुरंदरच्या तहामध्ये जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक हा तिकोना किल्ला आहे.
गडावरून आसपासचा प्रदेश तर सुदंर दिसतोच पण त्या व्यतिरिक्त त्रिम्बकेश्वरचे मंदिर
तसेच तुळजाई देवीचे मंदिर व एक फार सुंदर असे 'मंदिर असलेले लेणे' देखील आहे इथे एक फोटो घेतल्यावाचून आपल्याला राहवणाराच नाही.
तिथे एक टाके खोदलेले आहे आणि ह्या लेण्यांसमोर एक तळेही आहे. तसेच हनुमंताची सुंदर कोरीव काम केलेली मोठी मूर्ती सुद्धा आपल्याला आकर्षून घेते.
ह्या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग भातराशीचा डोंगर असे अनेक परिसर न्याहाळून घेता येतात.
वरती किल्ल्यावर जात असताना एक भला मोठा चुन्याचा घाणा आपल्या दृष्टिक्षेपास येतो. हा घाणा जात्याची नक्कीच आठवण करून देतो.
काही ठराविक ठिकाणी अत्यंत कठीण म्हणता नाही येणार पण चढण्यास आणि उतरण्यास उभट अशा वाटा आहेत इथे मात्र सावधपणाची भूमिका घेणं उत्तम. हे अपवाद वगळता किल्लावर जाणे तसे सोप्पे आहे.
किल्ल्यावर जाताना अनेक जंगली केळीची झाडे आपल्याला दिसतात. ह्या केळीच्या झाडांची पाने मात्र फार लांब आणि मोठी आहेत ज्या ठिकाणी ह्या केळीची झाडे आपल्या दिसतात तसेच ह्यांच्या पानांची लांबी पाहून कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही..
त्यामुळे तिकोना किल्ल्याला भेट देणं हे आपल्याला सुखावून टाकेल ह्यात काहीच शंका नाही. आणि जर पाऊस पडत असेल तर जरा जास्तच मज्जा अनुभवता येईल ह्यालाहि दुमत नाही.
|| जय जगदंब जय दुर्गे ||
काही माहिती विकिपीडिया व मराठीमाती.कॉम मधून आहे
![]() |
तिकोना किल्ला |
पवना नदी जवळ असणारा हा किल्ला पुण्यापासून साधारणतः ६० किमी आणि मुंबईपासून १२१ किमी अंतरावर आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणांनी नक्कीच लहानपणी पाटीवर किंवा पेपर व वही वर डोंगररांगा आणि त्यामधून येणारी नदी अशा प्रकारचे चित्र काढलेलं असेलच. तिकोना किल्ल्यावरून जेव्हा ह्या सुंदर पवना नदीस नजर पडते तेव्हा लहानपणीच्या ह्या गोष्टीची आठवण आल्यावाचून आपल्याला राहणार नाही.
![]() |
किल्ल्यावरून दिसणारी नदी |
तिकोना हा किल्ला तसा महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक होता आणि ह्याचे ऐतिहासिक महत्व सुद्धा आहेच. इ.स १५८२-८३ मध्ये अहमद निजामशहा यानी जुन्नर या प्रांतावर हल्ला चढवला व आजूबाजूचा बराचसा प्रांत बळकावला. लोहगड काबीज केल्यावर त्याने आपले लक्ष्य तुंग आणि तिकोना कडे वळवले व १५८५ पर्यंत त्यांनी हा किल्ला सर केला आणि निजामशाहीत आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५७ रोजी हा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात मानाने आणला. १६६५ रोजी झालेला पुरंदरचा तह सर्वांना ज्ञात आहेच त्या पुरंदरच्या तहामध्ये जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक हा तिकोना किल्ला आहे.
गडावरून आसपासचा प्रदेश तर सुदंर दिसतोच पण त्या व्यतिरिक्त त्रिम्बकेश्वरचे मंदिर
तसेच तुळजाई देवीचे मंदिर व एक फार सुंदर असे 'मंदिर असलेले लेणे' देखील आहे इथे एक फोटो घेतल्यावाचून आपल्याला राहवणाराच नाही.
![]() |
तुळजाईचे मंदिर व त्यासमोरील तळे |
तिथे एक टाके खोदलेले आहे आणि ह्या लेण्यांसमोर एक तळेही आहे. तसेच हनुमंताची सुंदर कोरीव काम केलेली मोठी मूर्ती सुद्धा आपल्याला आकर्षून घेते.
हनुमंताची कोरीव मूर्ती |
ह्या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग भातराशीचा डोंगर असे अनेक परिसर न्याहाळून घेता येतात.
वरती किल्ल्यावर जात असताना एक भला मोठा चुन्याचा घाणा आपल्या दृष्टिक्षेपास येतो. हा घाणा जात्याची नक्कीच आठवण करून देतो.
![]() |
चुन्याचा घाणा |
![]() |
डावीकडे, केळीचे झाड व मोठी पाने |
किल्ल्यावर जाताना अनेक जंगली केळीची झाडे आपल्याला दिसतात. ह्या केळीच्या झाडांची पाने मात्र फार लांब आणि मोठी आहेत ज्या ठिकाणी ह्या केळीची झाडे आपल्या दिसतात तसेच ह्यांच्या पानांची लांबी पाहून कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही..
त्यामुळे तिकोना किल्ल्याला भेट देणं हे आपल्याला सुखावून टाकेल ह्यात काहीच शंका नाही. आणि जर पाऊस पडत असेल तर जरा जास्तच मज्जा अनुभवता येईल ह्यालाहि दुमत नाही.
|| जय जगदंब जय दुर्गे ||
काही माहिती विकिपीडिया व मराठीमाती.कॉम मधून आहे
Prasad, d banana plants u mentioned r not actually 'banana trees', as they don't bear fruits. They r called 'shravan keli', because their life cycle is limited to those months.
ReplyDelete